Soduko puzzle Mind Games: लहानपणापासून गणित म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र, गणित हा विषय नेहमी बुद्धीला चालना देणारा आहे. अनेकदा वृत्तपत्रात गणिती कोडी तुम्ही सोडवली असालच. रेल्वेतून जाताना, बसमध्ये किंवा ऑफिसमध्ये चहा पिताना अनेकजण गणिती कोडं सोडवताना दिसतात. तुम्हीही लहानपणी कोडी सोडवली आहेत का? असेल तर आत्ताच सोडवण्याचा प्रयत्न करा. फारच सोप्पं... थोडं डोकं लावा अन् झटक्यात विषय संपवून टाका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल होत असलेलं हे कोडं सोडवण्यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नाही. फक्त दोन ते तीन स्टेप्स सोडवून तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. लेवल वन म्हणजे खूपच सोप्या पद्धतीचं हे कोडं आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. काही गोष्टी डिव्हाईड करून तुम्ही झटपट हे कोडं सोडवू शकता. तुम्हाला कोणला पार्ट सोडवायचा आहे. ते आधी निश्चित करा. त्यावर फोकस करा आणि पहिला हिंट कुठे मिळेल याचा विचार करा. तुम्हाला लगेच दिसलं तर सेकंदात तुम्ही उत्तर शोधू शकता.



सध्या तुमच्यासमोर आव्हान असलेल्या या कोड्यात, 36/4 असा एक रकामा दिसतोय. त्याचं उत्तर पटकन लिहून घ्या. त्याचं उत्तर 9 असं लिहिल्यानंतर समोर 5 हा आकडा दिसतोय. मात्र, त्यावरून काहीच सोडवता येत नाहीये. अशा वेळी थोडी लांबच्या नजरेने पाहा. शेवटच्या उभ्या रकाण्यात येणारी संख्या 23 पेक्षा जास्तच असणार आहे. त्याचं कारण त्या कॉलममध्ये बेरीज होणार असल्याने उत्तर 23 पेक्षा जास्तच असेल. त्यामुळे आडव्या रकाण्यात 9 आणि 5 यांचा गुणाकारच होऊ शकतो. इतर कोणत्याही शक्यता या ठिकाणी शुन्य आहेत. त्यामुळे 9*5= 45 असंच उत्तर त्याठिकाणी असणार आहे. 


दरम्यान, आपल्याला 45 हा आकडा मिळल्याने आता गणित अगदी सोप्पं झालंय. शेवटच्या उभ्या कॉलममध्ये, अशी कोणती संख्या येईल? ज्यामध्ये 23 ही संख्या मिळवल्यावर 45 असं उत्तर येईल... अगदी सोपंय... तुमचं उत्तर 12 असेल. गणिती कोडं हा शक्यतांचा खेळ असतो. त्यामुळे उत्तर मिळवणं आव्हानात्मक असतं. तुम्हीही अशी कोडी सोडवून गणितीय आकडेमोड पटापट शिकू शकता.