सोलर पॅनलद्वारे मोफत वीजेसह पैसे कमावण्याची संधी
सोलर पॅनलच्या फायद्यांसह यातून कमाईचीही संधी आहे.
नवी दिल्ली : सोलर एनर्जीवर सरकारचा विशेष भर आहे. सोलर पॅनलच्या फायद्यांसह यातून कमाईचीही संधी आहे. सोलर पॅनल लावणाऱ्यांना केंद्र सरकारकडून रुफटॉप सोलर प्लांटवर 30 टक्के सब्सिडी मिळते. बिना सब्सिडी रुफटॉप सोलर पॅनल लावण्यासाठी जवळपास 1 लाख रुपये खर्च येतो.
एका सोलर पॅनलची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. राज्यांनुसार हा खर्च वेगळा असतो. सब्सिडीनंतर एक किलोवॅट सोलर प्लांट 60 ते 70 हजार रुपयांत इन्स्टॉल करता येऊ शकतो.
सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीशी संपर्क करावा लागतो. राज्यातील प्रमुख शहरांत यासाठीची ऑफिसेस आहेत. प्रत्येक शहरांत खाजगी डीलर्सकडेही सोलर पॅनल उपलब्ध असते. यासाठीचा सब्सिडी फॉर्म अथॉरिटी कार्यालयात मिळू शकतो.
सोलर पॅनलची क्षमता 25 वर्षांपर्यंतची असते. यापासून वीज सौरउर्जेपासून मिळते. सोलर पॅनलसाठी मेन्टेन्स खर्च नसतो. मात्र दर 10 वर्षांनी एकदा बॅटरी बदलावी लागते. याचा खर्च जवळपास 20 हजार रुपये इतका होतो. या सोलर पॅनलला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येतं.
राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यासारख्या राज्यांमध्ये सोलर एनर्जी विकण्याची सुविधा दिली जाते. सोलर पॉवर प्लांटमधून तयार केलेली वीज पॉवर ग्रीडशी जोडून राज्य सरकारला विकता येऊ शकते. उत्तर प्रदेशने सोलर पॉवरचा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन स्किम सुरु केली आहे. या अंतर्गत सोलर पॅनलच्या वापरावर वीज बिलात सूट देण्यात येते.
पैसे कमावण्याची संधी -
- सोलर पॅनलद्वारे तयार केलेली वीज विकता येते. वीज विकण्यासाठी लोकल वीज कंपन्यांशी टाय-अप करावं लागेल. त्यासाठी लोकल वीज कंपन्यांकडून लायसन्स घ्यावं लागतं.
- वीज कंपन्यांशी पॉवर परचेज ऍग्रिमेंट करावं लागतं.
- सोलर प्लांट लावून प्रति किलोवॅट एकूण इन्व्हेस्टमेंट 60-80 हजार रुपये असू शकते, तर वीज विकल्यानंतर प्रति यूनिट 7.75 रुपयाच्या दराने पैसे मिळू शकतात.