North East Express : बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले; पाहा Video
North East Express Accident :दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रात्री ९.३५ वाजता आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या रेल्वे क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Bihar Railways Accident : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात रेल्वे अपघाताचे कट रचले जात असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता बिहारमधून धक्कादायक बातमी (North East Express Accident) समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी संध्याकाळी नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या तीन बोगी रुळावरून (Coaches Derail) घसरल्या. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलं नाही. दिल्लीतील आनंद विहार येथून येणारी ही ट्रेन आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या जंक्शनकडे जात असताना ही घटना घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन एसी बोगी पलटी होऊन रुळावर पडल्या. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी ही घटना झाली असल्याने अनेक प्रवाशी झोपेत होते. त्याचवेळी हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
पाटणा जंक्शन (PBE)- 9771449971
दानापूर (DNR)- 8905697493
आरा- 8306182542
COML CNL- 7759070004
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंदेभारत ट्रेन क्र. 20977 च्या मार्गादरम्यान राजस्थानच्या चित्तोडगड-भीलवाडा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर दगड आणि लोखंड ठेवून या गाडीला अपघात करण्याचा डाव रचला होता. मात्र, यावेळी दुर्घटना टळली होती. त्यानंतर देखील मालगाडी घसल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे अपघात आहे की घातपात असा सवाल विचारला जात आहे.