नवी दिल्ली : माजी लोकसभा अध्यक्ष आणि दीर्घकाळ सीपीएमचे नेते राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव सीपीएमच्या झेंड्याऐवजी सर्वात जुना फुटबॉल क्लब मोहन बागानच्या झेंड्यानं झाकण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी लोकसभा अध्यक्षांचा कुटुंब सीपीएमवर दीर्घकाळापासून नाराज होतं. सोमनाथ चॅटर्जी यांना सीपीएमनं जुलै २००८ मध्ये पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला होता. पक्षाच्या विचारधारांच्या विरोधात गेल्यानं सीपीएम नेतृत्वानं हा निर्णय घेतला होता. त्यामुळे कुटुंब दीर्घकाळापासून पक्षावर नाराज होतं.


...म्हणून नाकारली परवानगी


१० वेळा लोकसभा सदस्य राहिलेल्या सोमनाथ चॅटर्जी यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, सीपीएम नेत्यांनी चॅटर्जी यांचं पार्थीव पक्षाच्या झेंड्यानं झाकण्याची परवानगी मागितली होती. परंतु, आपण त्याला नकार दिला. २००८ साली ज्या पद्धतीनं सीपीएमनं सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षातून बाहेर काढळं होतं... त्या घटनेला कुटुंब आत्तापर्यंत स्वीकार करू शकलेलं नाही. 


यामुळेच, कुटुंबानं चॅटर्जी यांचं पार्थिव ना सीपीएम कार्यालयात ठेवू दिलं ना पक्षाच्या झेंड्यानं पार्थिव झाकण्याची परवनागी दिली. 


पार्थिव हॉस्पीटलला दान


सोमनाथ चॅटर्जी सर्वात जुना फुटबॉल क्लब असलेल्या मोहन बागानचे दीर्घकाळ सदस्य राहिले. जवळपास ५० वर्ष ते या क्लबचे सदस्य होते. त्यामुळे याच क्लबच्या झेंड्यानं त्यांचं पार्थिव झाकण्यात आलं. सोमनाथ चॅटर्जी यांच्या इच्छेनुसार, त्यांचं पार्थिव शरीर एसएसकेएम हॉस्पीटलला दान करण्यात आलं.