पाच मुलींनंतर मुलगा झाला, पण आनंद क्षणभरच टिकला; जन्माच्या दोन दिवसांतच...
Newborn Baby Stolen From Hospita: रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे, तर पोलीस युद्धपातळीवर बाळाचा तपास करत आहेत.
Newborn Baby Stolen From Hospital: पाच मुलींनंतर मुलगा झाला मात्र दोन दिवसांतच घडलं असं काही की संपूर्ण कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयातून आज 16 ऑगस्ट रोजी एका नवजात मुलाची चोरी करण्यात आली आहे. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बाळाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांची तपास सुरू केला आहे. तसंच, रुग्णालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. ज्या महिलेचे बाळ चोरी करण्यात आले आहे तिला याआधी पाच मुली आहेत. (Newborn Baby Stolen From Hospital News)
उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील ही महिला रहिवाशी असून तिचे नाव शहरीन असं आहे. या महिलेल्या आधीपासून पाच मुली आहेत. या जोडप्यांना मुलगा हवा होता. अखेर 14 ऑगस्ट रोजी पाच मुलींनंतर तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र दोन दिवसांनंतर तिच्या नवजात बाळाला कोणीतरी रुग्णालयातून चोरी केल्याचा प्रकार घडला. आपला लेक गायब असल्याचे कळताच या माऊलीच्या पायाखालची जमीन हादरली आहे. रुग्णालयातच रडून रडून तिने स्वतःची तब्येत बिघडवून घेतली आहे.
शहरीनने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजेपर्यंत ती जागी होती. तेव्हा बाळ तिच्या व तिच्या मोठ्या भावजयीच्या मध्ये झोपले होते. त्याचवेळी दोघींना झोप लागली. दोघी झोपल्या असतानाच नवजात बाळाला तिथून उचलण्यात आले. काही वेळानंतर जेव्हा बाळाच्या आईला जाग आली तेव्हा तिथे बाळ नव्हते. तिने आरडाओरडा केल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडूननंतर शोधाशोध करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात फिरत होती. तिने शहरीनसोबतही गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तीदेखील रुग्णालयात दाखल आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत, असं सांगितलं. त्याच महिलेने शहरीनच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उचलून घेऊन गेली आहे. सीसीटीव्हीमध्ये एक महिला मुलाला घेऊन जाताना दिसत आहे.
घटनेची माहिती कळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिस आता रुग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत. सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.