हैद्राबाद : कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. रुग्णांना रुग्णालय, बेड, ऑक्सिजन आणि औषधांची पूर्तता होत नाहीये. एवढंच नाही तर मृत्यूनंतरही त्यांची फरफट थांबत नाहीये. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे अशीच एक घटना समोर आली आहे. मृत आईला रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह बाईकवरून स्मशानभूमीत नेण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

50 वर्षीय मृत महिलेत कोरोनाचे लक्षणं होते. परंतु तीचा कोरोना तपासणी अहवाल आला नव्हता. अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. जी चेन्चुला या श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मंडासा मंडल गावात राहणारी महिला होती. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तेथे त्यांचे निधन झाले.


CT Scan नंतर मृत्यू


रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आला होता. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. कुटूंबियांना हे देखील नाही माहित की, महिला कोरोना पॉझिटिव्ह होती की नाही. 


महिलेचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यासाठी कुटूंबियांनी बराच वेळ पाहिली. परंतु त्यांना कुठेच रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर महिलेचा जावाई आणि मुलाने मृतदेह बाईकवर बसवून स्मशानभूमीत नेला.



कोरोना रुग्णांची होत असलेल्या अवहेलनेमुळे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. कोरोना तपासणी अहवाल प्राप्त व्हायला 2-3 दिवसांचा वेळ लागत असेल.  कोरोना रुग्णांना उपचार कसे मिळणार. 


जेवढा जास्त वेळ घालवला तेवढा जास्त कोरोना रुग्णांच्या जीवाला धोका असूनही रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया सोशलमीडियावर उमटत आहेत