वाढदिवशी मुलाने संपवलं आईला, निमित्त ठरलं पार्टीचं, थरकाप उडवणारी घटना
जन्म दिलेला मुलगा आईसोबत सैतानासारखा वागला आहे.
Crime News : ज्या आईने जन्म दिला त्याच आईला मुलाने संपवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने त्याच्या वाढदिवसादिवशी आईची हत्या केली आहे. हत्या करून आरोपी मुलगा आईचा मृतदेह घरामध्येच ठेवतो. (Marathi Crime News या घटनेने गावामध्ये खळबळ उडाली आहे. मृत आईचं नाव नोध्यान बाई मेघवाल तर आरोपी मुलाचं नाव सूरज असं आहे. (Son Killed Mother)
नेमकं काय घडलं?
सूरजचा वाढदिवस होता, त्याला वाढदिवसाची मित्रांसोबत पार्टी करायची होती. पैसे नसल्यामुळे त्याने घरातील बकरी विकतो आणि बकरी विकून मिळालेल्या पैशाने जंगी पार्टी करतो. जेव्हा त्याची आई घरी येते तेव्हा त्याला पार्टीसाठी पैसे कुठून आले? असं सूरजला विचारते. तेव्हा सूरज बकरी विकल्याचं आईला सांगतो.
दोघांमध्ये यावरून जोरदार भांडण होतं, भांडणं खूप टोकाला जातं. रागाच्या भरात सूरज त्याच्या आईच्या डोक्यामध्ये हातोडीने घाव घालतो. हातोडीच्या घावाने त्याच्या आईचा जाग्यावरच मृत्यू होतो. क्रूर मुलगा इतकंच करून राहत नाही मृत आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरतो.
रात्री जेव्हा वडील घरी येतात तेव्हा ते सूरजला विचारतात आई कुठे आहे?, त्यावर सूरज, शेतात गेली आहे असं सांगतो. मात्र जेव्हा वडील खडसावून विचारतात तेव्हा तो सर्व प्रकार सांगतो. पोलिसांनी आरोपी सूरजला ताब्यात घेतलं आहे. राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील सुनेल पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे.