Crime News in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा फायनल (World Cup 2023) सामना खेळवला गेला होता. या सामन्यानंतर 130 कोटी भारताची मनं दुखावली गेली आहेत. भारत फायनल हारला अन् देशभरात राडा सुरू झाला. कुठं मारामारी पहायला मिळाली तर काहींनी आत्महत्या केल्याचं वृत्त देखील समोर आलं होतं. अशातच आता कानपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. फानयल सामना सुरू असताना मुलाने टीव्ही बंद केला म्हणून बापाने मुलाचीच हत्या केल्याची (Crime News) घटना समोर आली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या छोट्या गोष्टींवरून दररोज होणाऱ्या वादातून एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलाचा खेळ खल्लास केला. त्येची माहिती मिळताच डीसीपी पूर्व तेज स्वरूप सिंह, एडीसीपी लखन यादव, प्रभारी एसीपी ब्रिज नारायण सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.  सोमवारी सकाळी तरुणाची मावशी घरी पोहोचली असता तिला घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी तिला पित्यानेच मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस देखील अँक्शन मोडवर आली आहे.


नेमकं काय झालं?


दोन वर्षांपूर्वी तरुण दीपकचं फतेहपूर इथं राहणाऱ्या सुमनसोबत लग्न झालं होतं. सुमारे एक वर्षापासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती. नवरा आणि सासऱ्याला दारूचं व्यस्न असल्याने तिने आई-वडिलांकडे घरोबा केला. दीपकचे दारूच्या नशेत आई-वडिलांशी अनेकदा भांडण होत असायचा. अनेकदा त्याने मारहाण देखील केलीये. त्यामुळे आईही सरसैया घाटातील तिच्या माहेरी गेली. त्यामुळे घरी मुलगा आणि बाप दोघंच असायचे. त्यामुळे जेवण बनवण्यावरून अनेकदा दोघांमध्ये भांडणं होत असायची. पण वर्ल्ड कप फायनलच्या रात्री काळाने घात केला.


वर्ल्ड कप फायनल सुरू असताना वडिल सामना पाहत होते. त्यांनी नेहमीप्रमाणे दारू देखील घेतली होती. तर दारू  पिऊन घरी आलेल्या मुलाची आणि वडिलांची जेवण बनवण्यावरून वाद झाला. या भांडणात मुलाने टीव्ही बंद केला. त्यामुळे बापाचा पारा चढला. टीव्ही का बंद केली? यावरून दोघांमध्ये वाद पेटला, हाणामारी झाली अन् बापाने पोटच्या मुलाचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. 


आणखी वाचा - दारु पिण्याआधीच तरुणीची नशा उतरली; ऑनलाईन दारु मागवली आणि तिकडेच फसली


दरम्यान, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. नशेमुळे त्यांच्यात रोज वाद होत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. रविवारीही दोघे दारूच्या नशेत होते. यावेळी गणेश टीव्हीवर सामना पाहत होता तर दीपक वारंवार टीव्ही बंद करत होता. यानंतर दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरून वाद झाला, अशी माहिती प्रभारी एसीपी ब्रिज नारायण सिंह यांनी दिली आहे.