मुंबई : टिकटॉक स्टार सोनाली फोगट मृत्यूप्रकरणात आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे . सोनालीचा पीए सुधीर सांगवान तिला जबरदस्तीनं ड्रिंक पाजत असल्याचं समोर आलं आहे. याच ड्रिंकमध्ये सुधीरनं ड्रग्ज मिसळलं होतं. त्याचंच सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलं आहे. गोव्यामध्ये सोनाली फोगटचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली फोगटच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे.  22 ऑगस्ट 2022 रोजी रात्री उशिरा कर्लिस बीच क्लबमधील हा व्हिडिओ आहे. कर्लिस नाईट क्लबच्या पहिल्या मजल्यावरील डान्स फ्लोअरवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये अटकेत असलेला आरोपी सुधीर सांगवान हा सोनाली फोगटसोबत डान्स करत असल्याचे आणि सोनालीला जबरदस्तीने दारू पाजत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.



सोनालीची अवस्था ड्रिंक पिण्याची नसतांना देखील सुधीर सोनालीला जबरदस्ती ड्रिंक पाजत आहे. असा आरोप आहे की या पेयात एमडी ड्रग मिसळले होते. गोवा पोलीस या अँगलने देखील तपास करत आहे. त्यामुळे मृत्यूमागचं खरं कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.