मुंबई : शेअर बाजार अशी जागा आहे की, जेथे तुम्ही तुमची कमाई दुप्पट तिप्पट करू शकता. शेअर बाजारात पैसा लावण्यासाठी रिस्क कॅल्कुलेट करणे गरजेचे आहे. सुरूवातीला पैसा लावण्यासाठी ते एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतात. 
मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 दमदार शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Sonata Software आणि Sandhar Technologies हे दोन शेअर त्यासाठी त्यांनी निवडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sandhar Technologies 
कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस आहे. याशिवाय नुकते टेस्लाने आपल्या कंपोनंट साठी भारतात तीन कंपन्यांशी चर्चा केली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये दुचाकीचा बेल्ट बनवणारी संधार टेक्नॉलॉजी प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीचे 29 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट भारतात आहे. याशिवाय 2 प्लांट स्पेन आणि 1 प्लांट मॅक्सिकोमध्ये आहे.


Sandhar Technologies - Buy Call
CMP 314.70
Target 320
Stop Loss 290


कंपनीचे फंडामेंटल्स
कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहे. डेट इक्विटीचे प्रमाण 0.26 टक्के आहे. कंपनीच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी 70 टक्के आहे.



Sonata Software
ही एक हाय  ग्रोथ सेंगमेंटची कंपनी आहे. परफॉर्मन्स सॉलिड आहे. मागील 1 वर्षात कंपनीने 20.25 रुपये प्रति शेअरचा डिविडंड दिला होता. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 27 टक्के आहे. डेट इक्विटी रेशोचे प्रमाण 0.10 टक्के आहे.


Sonata Software - Buy call
CMP - 854
Target - 885
Stop Loss - 840 


कसे आहेत कंपनीचे जून तिमाहीचे निकाल
कंपनीने जून तिमाहीमध्ये दमदार निकाल जारी केले आहेत. जूनमध्ये कंपनीला 68 कोटींचा नफा झाला होता.जो मागील वर्षाच्या तुलनेत चांगला आहे.