मुंबई  : मतदानानंतर अखेर आज गुजरात (Gujrat) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Assembly Election Result 2022)  या दोन्ही विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. गुजरातमध्ये भाजपचा (Bjp) पुन्हा एकदा विजय झाला. तर काँग्रेसने (Congress) हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता मिळवलीय. काँग्रेसने हिमाचलमध्ये बहुमताचा आकडा गाठलाय. यानंतर आता काँग्रेस मोठी रणनिती आखली आहे. आपले विजयी उमेदवार फुटु नयेत यासाठी काँग्रेसने खबरदारी घेतलीय. (sonia and priyanka gandhi will meet congress winning candidate in himachal pradesh assembly election result 2022 rajsthan bharat jodo yatra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचलमध्ये काँग्रेस उमेदवार फुटण्याची भीती काँग्रेसला वाटतेय. सध्या कांग्रेसची 'भारत जोडो यात्रा' राजस्थानमध्ये आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहेत.  त्यामुळे आता या सर्व विजयी उमेदवारांचे सारथ्य करण्याची जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर असणार आहे.



काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या राजस्थानमधल्या सवाई माधोपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी यासुद्धा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी रणथंभोरमधल्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारांशी चर्चा करतील.