नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यानंतर, अधिकृत कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं, या दरम्यान त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, या भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या, आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.


सोनिया गांधी एक मिनिटं उभ्याच होत्या


सोनिया गांधी मिनिटभर थांबल्या तरी फटाके बंद होत नव्हते, न राहावल्या सारख्या काहीशा रागावत, त्या म्हणाल्या, मी बोलू शकत नाहीय.


तेव्हा राहुल गांधी हे उठले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना फटाके बंद करण्याची मागणी केली.


राज ठाकरे देखील फटाक्यांवर संतापतात तेव्हा


राज ठाकरे यांच्या मनसे पक्ष स्थापनेच्या, पहिल्या जाहीर सभेतही असंच झालं होतं, तेव्हा राज ठाकरे देखील काहीसे असेच संतापले होते, ते म्हणाले होते, 'विझवा रे ते, हे फटाके पण चायनीज माणसारखेच असतात, एकदा सुरू झाले की बंद होण्याचं नावचं घेत नाहीत'.


सोनिया देखील दिल्लीच्या आजच्या जाहीर कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यासारख्याच फटाक्यांवर संतापल्या होत्या. अखेर राहुल गांधींनी फटाके विझवण्याची विनंती केल्यानंतर, सोनियांच्या भाषणाला सुरूवात झाली.