Sonia Gandhi Mother Paolo Maino Passed Away: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनिया गांधींच्या आईचं निधन झालं आहे. काँग्रेस प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. "सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचं 27 ऑगस्ट 2022 ला इटलीतील राहत्या घरी निधन झालं. त्यांच्यावर 28 ऑगस्टला अंत्यसंस्कार करण्यात आले."


सोनिया गांधी मागच्याच आठवड्यात आपल्या आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी वाड्रा उपस्थित होते.