इटलीत वडिलोपार्जित संपत्ती पण स्वत:ची गाडी नाही! किती आहे सोनिया गांधींचे नेटवर्थ?
Sonia Gandhi Property: सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्राम सोने आणि ज्वेलरी आहे.
Sonia Gandhi Property: कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची संपत्ती किती याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. दरम्यान सोनिया गांधी यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना आपल्या संपत्तीची माहिती जाहीर केली. इटलीमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. सोनिया गांधी यांची इटलीमध्येदेखील संपत्ती आहे.
सोनिया गांधी यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. इटलीच्या लुसियानामध्ये सोनिया यांच्या वडिलांचे घर आहे. सोनिया यांच्याकडे 12.53 कोटींची संपत्ती आहे. 5 वर्षात सोनिया गांधींच्या संपत्तीत 72 लाखांनी वाढ झाली आहे. तर 12 एकर जमीन कमी झाली आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्याकडे स्वत:च्या मालकिची कार नाहीय.
5 वर्षात 12 एकर जमीन झाली कमी
सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्राम सोने आणि ज्वेलरी आहे. 2019 मध्ये दिल्लीच्या जवळ असलेल्या डेरामांडी गावात 3 एकर जमीन आणि सुल्तानपूर महरौलीमध्ये 12 एकर जमीन असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. पण यावेळच्या शपथपत्रामध्ये त्यांनी 12 एकर जमिनीचा उल्लेख केला नाही. त्यांच्याकडे आता डेरांमंडी गावातील 3 एकर शेतजमीन आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधी यांनी आपल्याकडे कोणती दुचाकी किंवा चार चाकी नसल्याचा दावा केला होता. सोनिया गांधी यांचा पेंगुइन बुक इंडिया, ऑस्कफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आनंदा पब्लिशर्स आणि कॉंटिनेंटल प्रकाशनसोबत करार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या प्रेसमधून 1.69 लाखाची रॉयल्टी मिळत असल्याचा उल्लेख त्यांनी एफिडेव्हिटमध्ये केला आहे.
घरबसल्या चांगली कमाई करण्याचे 7 पर्याय
खटल्यांची माहिती
सोनिया गांधी यांनी आपल्या शपथपत्रामध्ये आपल्याविरुद्ध सुरु असलेल्या खटल्यांची माहिती दिली आहे. यामध्ये दिल्लीच्या राऊज एवेन्यू जरनल्स प्रकरणार फसवणुकीचा गुन्हा, याव्यतिरिक्त कलम 120 बी, 420, 403 प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला आहे.
Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार
सोनिया गांधींकडे 12.53 कोटींची संपत्ती
सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी आणि 1267 ग्राम सोने आणि काही ज्वेलरी असल्याचा उल्लेख शपथपत्रात आहे. आपल्याकडे स्वत:ची कार नसल्याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केलाय. यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ प्रेसमधून 1.69 लाख रुपयांची रॉयल्टी मिळत असल्याचा उल्लेख केलाय.