Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: सीताराम यांनी सशांची जोडी पहिल्यांदा 200 रुपयांना विकत घेतली होती, मात्र आता तीच जोडी 500 रुपयांना विकत आहे.

Updated: Dec 5, 2023, 08:40 AM IST
Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार title=
Rabbit Makes Employment

Business Idea: अनेकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमका काय व्यवसाय करायचा हे समजत नसते. पण कधीकधी आपली आवडच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आपली आवड पैसे कमावून देणाऱ्या रोजगाराचा स्रोत बनते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीने छंद म्हणून जोपासलेले कामामुळे तो आज दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. सीताराम केवट हे बिहारमधील कटिहारमधील हसनगंजमध्ये राहतात. त्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण काही कारणांमुळे ती इच्छा प्रयत्यक्षात उतरत नव्हती. कालांतराने तेदेखील व्यवसायाची गोष्ट विसरुन गेले. दरम्यान त्यांनी ससे पाळण्याचा विचार केला आणि त्यांनी बाजारातून सशांची जोडी आणली. आज त्यांचा हा छंद त्यांना रोजगार मिळवून देत आहे.

सुरुवातीला सीताराम यांनी त्यांच्या छंद म्हणून बाजारातून सशांची जोडी विकत घेतली होती. पण लोक त्याच्याकडून ससे विकत घेऊ लागले आणि त्यांच्या घरात सशांची संख्या वाढू लागली. या क्रमाने सीताराम यांनी पाच डझनहून अधिक ससे विकले आहेत आणि अजूनही त्यांच्या घरी डझनभर आहेत. आता सशामुळेच त्यांच्या घराचा उदरनिर्वाह सुरु झाला आहे. 

सीताराम यांनी सशांची जोडी पहिल्यांदा 200 रुपयांना विकत घेतली होती, मात्र आता तीच जोडी 500 रुपयांना विकत आहे. आजूबाजूच्या गावांव्यतिरिक्त शहरातील लोकही त्याच्याकडे ससे विकत घेण्यासाठी येतात. आज त्यांचा ससे पालनाचा छंद चांगला व्यवसाय बनला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होत आहे.  सितारामा यांनी आवड म्हणून बाजारातून सशाची जोडी विकत घेतली होता. त्यांनी सशाच्या जोडीला खूप प्रेम दिले, त्याचे चांगले पालनपोषण केले. तोपर्यंत त्यांचा व्यवसायासाठी उपयोग करावा असे त्यांच्या मनातदेखील नव्हते. या सशाच्या जोडीला पिल्ले झाली.  घरी येणाऱ्या लोकांना ही पिल्ले आकर्षित करू लागली. 

लोक सीताराम यांच्याकडे सशांची पिल्ले मागू लागली. सुरुवातीला सीताराम सशाचे पिल्लू लोकांना पैसे न देता भेट देत असतय पण नंतर काही लोक त्यासाठी पैसेही देऊ लागले. जेव्हा पैसे येऊ लागले, तेव्हा सीताराम यांनी ससापालन हा त्यांचा व्यवसाय स्वीकारला.

छंदाचे रोजगारात रूपांतर

मादी ससे वर्षातून सहा वेळा बाळांना जन्म देतात आणि त्यांच्या अन्नासाठी फारसा खर्च होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ते गवत, उरलेल्या भाज्या, भाकरी, भात आणि हरभरा खातात. सशाची चांगली काळजी घेताना स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्या राहण्यासाठी लोखंडी जाळीची पेटी बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये ससे ठेवण्यात आले आहेत.

सरकारी मदत मिळाल्यास ससा पालनाप्रमाणे गाई-बकरी पालन हा मोठा रोजगार बनवणार असल्याचे सीताराम सांगतात. आज सिताराम यांना होणारा नफा पाहून हसनगंज गावातील इतर अनेक लोकही ससा पालनात उतरू लागले आहेत. हे त्यांच्या व्यवसायाचेच यश म्हणावे लागेल. सिताराम यांनी बिहारमध्ये हा व्यवसाय सुरु केलाय, तुम्ही तुमच्या येथे अंदाज घेऊन याची सुरुवात करु शकता.