सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, `या` सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून
Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. एका पुस्तकात याबाबत एक किस्सा सांगितला आहे.
Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या जोडीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या लग्नाबाबतचा खुलासा पत्रकार लेखक रशीद किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. किदवई यांनी अलीकडेच नेता अभिनेता बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात राजीव गांधी यांच्या लग्नाबाबत खळबळजनक दावा केला आहे. राजीव गांधी यांच्यासाठी सोनिया या इंदिरा गांधींच्या पहिली पसंत नव्हत्या. तर, बॉलिवूड मधील प्रसिद्ध घराण्यातील मुलीसोबत त्यांना राजीव गांधींचे लग्न लावून द्यायचे होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची कँब्रिज विद्यापीठात पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, या लग्नाला सोनिया गांधी यांच्या घरच्यांचा नकार होता. भारतातील मुलासोबत त्यांनी लग्न करु नये, असं त्यांच्या घरातील सदस्यांना वाटत होते. तर, एकीकडे सोनियादेखील इंदिरा गांधी यांच्या पहिली पसंत नव्हत्या. इंदिरा गांधी यांना राजीव गांधी यांचे लग्न बॉलिवूडमधील पॉवरफुल घराण्यातील मुलीसोबत लावून द्यायचे होते.
राजकारणातील सर्वात दिग्गज घराणे म्हणून गांधी यांची गणना होते. तर, चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे डोळ्यापुढे येते. पूर्वी या दोन्ही घराण्यात सलोख्याचे संबंध होते. इंदिरा गांधी राजीव गांधी यांचा विवाह राज कपूर यांच्या मोठ्या मुलीसोबत करुन द्यायचा होता. रशीद किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. इतकंच नव्हे तर, राज कपूर यांची नात व अभिनेत्री करीना कपूरने 2002मध्ये राहुल गांधी पसंत असल्याचे म्हटलं होतं.
रशीद किदवई यांनी पुस्तकात नमूद केलं आहे की, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि बॉलिवूड अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. त्यामुळं इंदिरा गांधीदेखील कपूर घराण्याचा मान-सन्मान करत. इंदिरा गांधी यांना या कुटुंबातील मैत्रीचे नाते पुढे न्यायचे होते. त्यामुळं त्यांनी राजीव गांधी यांचा विवाह राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतु कपूर यांच्यासोबत लावायची इच्छा इंदिरा गांधी यांची होती.
किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे की, इंदिरा गांधी यांना बॉलिवूडशी जोडलेली मुलगी सून म्हणून नको होती. त्यांना स्टारसारख्या गोष्टींशी काहीच घेण-देण नव्हते. फक्त त्यांच्या मनात कपूर घराण्यासाठी खूप सन्मान होता. पण इंदिरा गांधी यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. राजीव गांधी शिक्षणासाठी ब्रिटनच्या कँब्रिज विद्यापिठात होते. तिथे त्यांची भेट सोनिया मायनो (सोनिया गांधी) यांच्यासोबत झाली. दोघांनी 1968 मध्ये लग्न केले.