सोनिया गांधी यांचा आक्रमक पवित्रा, G23 नेत्यांची कानउघडणी
काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा आज आक्रमक पवित्रा दिसून आला.
नवी दिल्ली : CWC meeting : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा आज आक्रमक पवित्रा दिसून आला. काँग्रेस कार्यकारिणीत त्यांनी G23 नेत्यांची (G-23 Leaders) चांगलीच कानउघडणी केली. मीडियाद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष आहे, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ठणकावून सांगितले. पक्षाची भूमिका काय मांडायची ते CWC ठरवेल, त्या म्हणाल्या. (Sonia Gandhi's advice in CWC meeting, 'I am full time president, do not talk through media')
काँग्रेसच्या मुख्यालयात (Congress Head Office) काँग्रेसच्या कार्यकारिणीत आज सोनिया गांधींनी आक्रमक पवित्रा घेत पक्षातल्या 23 जणांच्या गटाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मीडियाद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही असे त्यांनी या गटाला खडसावले. पक्षांतर्गत निवडणुका आणि अध्यक्ष निवडीची सातत्याने मागणी करणाऱ्यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले.
मीच काँग्रेसची पूर्णवेळ आणि कार्यशील अध्यक्ष आहे, असे त्या म्हणाल्या. 23 नेत्यांच्या समुहाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी कार्यकारिणी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. दरम्यान, काँग्रेस नेत्यांना खडसावताना त्यांनी विरोधकांनाही आपल्या कृतीतून फटकारले. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नाही, अशी विरोधकांकडून सातत्याने होत होती. त्यालाही उत्तर सोनिया गांधी यांनी दिले आहे. त्या म्हणाल्या, आपणच काँग्रेसची पूर्णवेळ आणि कार्यशील अध्यक्ष आहे.
CWC बैठकीत सोनिया गांधी काय म्हणाल्या?
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाव न घेता G-23 च्या नेत्यांना चांगलेच फटकारले. सोनिया गांधी यांनी या नेत्यांना सल्ला दिला. सोनिया गांधी म्हणाल्या की, मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे. माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी मुक्त आणि प्रामाणिक चर्चा करूया. परंतु या खोलीतील चर्चा भिंतीबाहेर काय घडले पाहिजे हा CWC चा सामूहिक निर्णय असेल, असे त्या म्हणाल्या.