सोनू सूदच्या घराबाहेर लोकांची गर्दी, व्हिडीओ पाहा
गेल्या वर्षी भारतात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी सर्वत्र लॅाकडाऊन केले होते अशा वेळी भारतातील जो मजुर वर्ग आहे, तो खूप त्रस्त झाला होता. तेव्हा सोनू सूद सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला.
मुंबई : गेल्या वर्षी भारतात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी सर्वत्र लॅाकडाऊन केले होते अशा वेळी भारतातील जो मजुर वर्ग आहे, तो खूप त्रस्त झाला होता. तेव्हा सोनू सूद सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला. त्यांने अनेक परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवले होते. त्याने मजुरांना नुसते घरी पोहचवले नाही तर, त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील केली. इतकेच नाही तर सोनूने बर्याच मुलांची फी देखील भरली आहे. तसेच बर्याच लोकांना सोनूने एअरलिफ्टमधूनही घरी पाठवले आहे. त्यामुळे या सर्व मजुर वर्गाने सोनूला देवाचा दर्जा दिला आहे. सोनू अजूनही लोकांची मदत करण्यापासून मागे हटत नाही.
आता अलीकडेच सोनूचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मदत मागण्यासाठी लोकं त्याच्या घराबाहेर पोहोचले आहेत. सोनू सगळ्यांना भेटायला घराबाहेर आला. तो सर्वांशी बोलला आणि म्हणाला की, प्रत्येकाच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील. सर्वांनी पुन्हा सोनूला थँक्यू म्हटले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळे लोकं सोशल मीडियावर सोनूचे कौतुक करत आहेत.
ऑक्सिजन कंसान्टमेंन्ट थांबवल्यामुळे चीनला आवाहन
सोनूने ट्वीट केले होते की, 'आम्ही हजारो ऑक्सिजन केंद्रे भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. चीनने आमच्या बर्याच वस्तूंवर बंदी घातली हे फार वाईट आहे, ज्यामुळे भारतात प्रत्येक मिनंटाला लोकांना जीव गमवावा लागत आहे. आम्ही आपणास विनंति करतो की, आमची कंसान्टमेंन्ट आणण्यास मदत करा जेणेकरुन आम्ही लोकांचे प्राण वाचवू शकू. या ट्वीटमध्ये सोनू सूदने चिनी दूतावासाला (Chinese Embassy) टॅग केले आहे.
सोनूच्या या ट्वीटला चीनच्या राजदूतांचं उत्तर
चिनी दूतावासानी (Chinese Embassy) लिहिले, 'सोनू सूद, मी तुमची परिस्थिती लक्षात घेत आहे. कोविड -19 मध्ये भारताला मदत करण्यासाठी चीन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.' चीनी राजदूताच्या ट्विटला सोनू सूद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्याने लिहिले- 'उत्तराबद्दल धन्यवाद, ही समस्या सोडविण्यासाठी मी तुमच्या कार्यालयाशी संपर्कात राहिन.'