भारतात नोटबंदी, जीएसटी; दक्षिण अफ्रिकेला फटका
भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारे केंद्र सरकारचे दोन निर्णय म्हणजे नोटबंदी आणि जीएसटी. या दोन निर्णयामुळे भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्था कमालीची ढवळून निघाली. पण, या निर्णयाचा फटका दक्षिण अफ्रिकेलाही बसला आहे. स्वत: दक्षिण अफ्रिकेनेच याची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारे केंद्र सरकारचे दोन निर्णय म्हणजे नोटबंदी आणि जीएसटी. या दोन निर्णयामुळे भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्था कमालीची ढवळून निघाली. पण, या निर्णयाचा फटका दक्षिण अफ्रिकेलाही बसला आहे. स्वत: दक्षिण अफ्रिकेनेच याची माहिती दिली आहे.
पर्यटन व्यवसायाला फटका
भारतात नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे भारतातून दक्षिण अफ्रिकेत जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर प्रचंड परिणाम झाला असून, त्यात घट झाली आहे. दक्षिण अफ्रिकेचे पर्यटन विभाग प्रमुख हब अल्पा जानी यांनी म्हटले आहे. की, भारताने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयाचा आम्हाला जोरदार फटका बसला आहे. किती पर्यंटक यंदा देशाला भेट देतील याचा आम्ही साधारण अंदाज बांधलेला असतो. त्यानुसार आम्ही आर्थिक आखणी करत असतो. मात्र, भारताने नोटबंदी, जीएसटीचा निर्णय घेतला आणि त्याचा आमच्या पर्यटन व्यवसायायाल फटका बसला.
पर्यंटकांची संख्या घटली
अल्पा यानी पुढे म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष २०१७ मध्ये भारतातून दक्षिण अफ्रिकेला साधारण १ लाख पर्यटक येतील अशी आपेक्षा होती. मात्र, या निर्णयामुळे ही संख्या ८९,८७२ इतकी राहिली. आता सुरू वर्षात ही संख्या ९६००० वर पोहोचेल ही आपेक्षा आहे.
पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी खास शो
दरम्यान, भारतीय पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेने भारताच्या विविध शहरांमध्ये रोड शोंचे आयोजन करण्यात आले आहे. हे रोड शो मुंबई, कोलकाता, बंगळुरू, येथे पार पडला असून, दिल्लीमध्ये सुरू आहे. दिल्लीनंतर हा शो अहमदाबाद येथे करण्यात येईल.