Sovereign Gold Bond: थेट सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा अनेकजण सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करतात. सरकारच्या या योजनेत गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतोय.तुम्ही गेल्या काही वर्षात सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सर्वसामान्यांना सोने विकण्याची ही योजना सरकारकडून बंद केली जाऊ शकते. हे बॉण्ड खूप महाग आणि समजायला खूप किचकट असल्याचे सरकारमधील काही जणांचे म्हणणे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुंतणवूकदारांनी 67 हफ्त्यांमध्ये 72 हजार 274 कोटी रुपयांचे एसजीबी खरेदी केले आहेत. यामध्ये 4 बॉण्डची मुदत पूर्ण झाले असून गुंतवणूकदारांना त्याचे पैसे परत मिळाले आहेत. 


8 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 228 टक्के फायदा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारकडून 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना सुरु करण्यात आली होती. बॉण्ड हे एक प्रकारचे कर्ज असून जे सरकार किंवा कंपनी घेते. गुंतवणूकदारांनी या योजनेत आपले पैसे जमा केले आहेत. आता सरकारला त्यांना जास्त पैसे परत करावे लागणार आहेत. ही योजना आरबीआयकडून राबवली जाते. 2015 मध्ये ही योजना सुरु झाली होती तेव्हा इश्यू प्राइस 2 हजार 684 रुपये प्रति ग्रॅम इतके होते. 2023 मध्ये मॅच्योरिटी पूर्ण झाल्यावर याचे रिडम्प्शन साइज वाढवून 6 हजार 132 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आले. गुंतवणूकदारांना गेल्या 8 वर्षात 228 टक्के फायदा झालाय.


गुंतवणूकदारांना 85 हजार कोटी रुपये देणे बाकी 


गुंतवणूकदारांना 85 हजार कोटी रुपये बाकी असल्याची माहिती सरकारकडून जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेट दरम्यान देण्यात आली. ही रक्कम मार्च 2020 च्या अखेरीस आलेल्या 10 हजार कोटी रुपयांपेक्षा 9 पट आहे. सोने खरेदीसाठी गुंतवणूकदारांची मागणी वाढली होती. त्यामुळे बाजार यासाठी तयार दिसत होता. 14 ऑगस्टपर्यंत सरकार ठरलेल्या खरेदी-विक्रीवर 8 टक्क्यांपर्यंत परतावा द्यायला तयार होते.सॉवरेन गोल्ड बॉण्ड बाजारात खरेदी-विक्री केले जाऊ शकते. तुम्ही डीमॅट अकाऊंटच्या माध्यमातून बीएसई आणि एनएसईवर बॉण्डची खरेदी-विक्री करु शकता. बॉण्ड विकल्यास होणाऱ्या फायद्यावर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. 


काय आहे सॉवरेन बॉण्ड योजना?


सॉवरेन बॉण्ड योजना सरकारकडून जारी करण्यात आलेला सोने खरेदीचा पर्याय आहे. जो आरबीआय सरकारकडून जारी करते. देशात सोने आयात करण्यावर लगाम लागावा यासाठी 2015 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या बॉण्डद्वारे तुम्ही ग्रॅमच्या हिशोबाने सोने खरेदी करता. या बॉण्डद्वारे मिळणारे सोने हे बाजार मुल्यापेक्षा स्वस्त असते. हा बॉण्ड साधारण 8 वर्षांपर्यत असतो. पण तुम्ही 5 वर्षानंतरदेखील बॉण्ड विकू शकतो. कोणीही व्यक्ती गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून किमान 1 ग्रॅम सोने आणि कमाल 4 किलो सोने खरेदी करु शकते. एखादी ट्रस्ट किंवा संस्था दरवर्षी 20 किलो सोने खरेदी करु शकते.