नवी दिल्ली : गुजरात निवडणूक निकालादिवशी राहुल गांधी चित्रपट पहायला गेले. यावरून भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून राज्यसभेतील समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.


भाजप इतकी संकुचीत का होत आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्रवाल यांनी म्हटले आहे की, चित्रपट पहाणे ही राहुल गांधींची व्यक्तिगत बाब आहे. त्यावरून भाजप इतकी संकुचीत विचारांची का होत आहे. हा एका व्यक्तीच्या खासगी जीवनाशी संबंधीत विषय आहे. असे असेल तर, एखाद्याने सुहागरात्र साजरी केली तरी, भाजपवाले विचारतील ती इथेच का साजरी केली? दरम्यान, याआधी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भाजप जेव्हा गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करत होती. तेव्हा, राहुल गांधी आपल्या मित्रांसोबत चित्रपट बघत होते. राहुल गांधी यांनी आपला पराभव मान्य केला होता. तसेच, त्यांनी ट्विटही केल्याचा आरोप काही मंडळींनी केला होता.



मोदींनी माफी मागावी, विरोधकांची मागणी


दरम्यान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर पाकिस्तानसोबत कट रचल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांकडून (कॉंग्रेस) केली जात आहे. संसदेतही हा मुद्दा तापताला आहे. संसंद अधिवेशनाचे काम खोळंबले आहे. त्यामुळे भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. यात कॉंग्रेसकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्याविरूद्ध रणनिती आखण्यात आली.