नवी दिल्ली : Swati Maliwal Action On Justdial: सोशल मीडिया असे एक ठिकाण आहे की एकीकडे ते लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते. तर दुसरीकडे सहज अवैध धंदे करण्याचे ठिकाणही बनत आहे. याचा पुरावा दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत घडलेल्या घटनेत समोर आला आहे. त्याच्यासोबत घडलेली ही घटना केवळ वाईट घटना नाही, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. वास्तविक स्वाती मालीवाल यांना जस्टडायलवर  (Justdial) स्पा मसाजसाठी (Spa Massage) माहिती मिळवायची होती, त्यानंतर त्यांना 150हून अधिक कॉलगर्ल्सचे  (Callgirls) दर सांगण्यात आले. (Spa Massage - Swati Maliwal Action On Justdial)


स्वाती मालीवाल यांचे ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची माहिती स्वतः स्वाती मालीवाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले की, 'आम्ही जस्टडायलला कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली. त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे 'रेट' सांगण्यात आले. मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे, या व्यवसायाला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?


जस्टडायल आणि दिल्ली पोलिसांना समन्स


दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्ट डायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.



दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आहे. या ठिकाणी पोलीस वेळोवेळी छापे टाकत असतात. मात्र, स्वाती मालीवाल यांना धक्कादायक माहिती मिळाली. मालीवाल यांनी या ट्विटमध्ये या मेसेजेसचा स्क्रिनशॉटही पोस्ट केला आहे.