इंद्राणी मुखर्जी माफीची साक्षीदार, पी.चिदंबरम देखील आरोपी
माजी अर्थमंत्री पी.चीदंबरम देखील याप्रकणी दोषी आहेत.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात दोषी इंद्राणी मुखर्जीने माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज केला असून तो न्यायालयाने स्वीकारला आहे. इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडियाची माजी संचालक आहे. माजी अर्थमंत्री पी.चीदंबरम देखील याप्रकणी दोषी आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीच्या सरकारी साक्षीदार बनण्याच्या अर्जाला गुन्हे अन्वेशण विभागाचेही समर्थन मिळाले होते. असे केल्यास याप्रकरणाची पकड मजबूत होईल असे गुन्हे अन्वेशण विभागाचे म्हणणे आहे.
2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला मिळालेल्या देश-परदेशातील गुंतवणुकी संदर्भात बोर्डाच्या मंजुरी संदर्भातील हे प्रकरण आहे. 305 कोटी रुपयांच्या हाय प्रोफाईल घोटाळ्यामध्ये माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे नाव देखील सहभागी आहे.
चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांना 2007 मध्ये परराष्ट्र गुंतवणूक संवर्धन बोर्डातून आयएनएक्स मीडियासाठी मंजूरी कशी मिळाली ? याची सीबीआय आणि ईडी याप्रकरणात चौकशी करत आहे. हे प्रकरण घडत असताना अर्थमंत्री पी. चिदंबरम होते. ही मंजूरी मिळवण्यासाठी आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांनी पी.चिदंबरम यांची भेट घेतल्याची माहीती ईडी आणि सीबीआयला मिळाली आहे. परराष्ट्र गुंतवणूक संवर्धन बोर्डातून मंजूरी मिळण्यास कोणता विलंब नको यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.