मुंबई : पंजाब नॅशनल बॅंक अर्था पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाला मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. ईडीच्या अर्जाला पीएमएलए न्यायालयाने मंजुरी दिल्यानं नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग काही प्रमाणात सुकर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी मागण्यात आली होती. नीरव मोदीनं पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३  हजार कोटींचा गंडा घातला आहे. हा घोटाळा उघड होताच नीरव मोदी फरार झाला आहे. 



दरम्यान, नीरव आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचलनालयानं नीरव विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने गेल्या आठवड्यात या घोटाळ्यातील आरोपींविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अपील केले होते.