मुंबई : ३१ मार्च २०२१ नंतर स्पेशल ट्रेन्स रद्द केल्या जाणार असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असून अफवा असल्याचं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे की काही बातम्यांच्या व्हीडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र रेल्वेने ३१ मार्चनंतर स्पेशल ट्रेन रद्द करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही.


ज्या बातम्यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत, त्या २०२०मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केलेल्या बातम्यांचे व्हीडिओ आहेत. त्या बातम्यांच्या व्हीडिओ क्लिपमध्ये छेडछाड करूनही अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.



रेल्वेने स्पष्ट केलंय की, एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन या त्यांच्या नियमित वेळेनुसार धावणार आहेत. त्यांच्या वेळापत्रकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.


अनलॉकनंतर जेव्हा रेल्वे प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू झाला, तेव्हा अनेक ट्रेन या स्पेशल ट्रेन म्हणून चालवल्या जाऊ लागल्या. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून ज्या ३० स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या, त्या जून महिन्यापर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.