CCTV VIDEO : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रांझी पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी रात्री एका कार चालकाने घरासमोर दुचाकीवर बसलेल्या तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारचा वेग खूप असल्याने मोठी दुर्घटना (Car Hits Scooty Rider) घडली. गाडीला धडक दिल्यानंतर कार विजेच्या खांबाला धडकली. घडलेल्या घटनेमुळे कारमधील चालक घटनास्थळीच कार सोडून पळून गेला. ही भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Speeding Car Hits Scooty Rider in Jabalpur, Accident Caught on CCTV Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांझी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रांझी अभियांत्रिकी महाविद्यालयात रावण दहनाचा कार्यक्रम होता. रांझी येथे राहणारा एक तरूण रावण दहन पाहण्यासाठी गेला होता. तो आपल्या बहिणीसह घरी परतला. त्यानंतर तो घरासमोरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर बसला. तेवढ्यात काळाने घात केला (Accident News).


दरम्यान, कारच्या चालकाने तरूणाच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तो 10 फुट उंच उडून जमिनीवर पडला. त्याचबरोबर आणखी दोन लोकं देखील अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कारही नियंत्रणाबाहेर जाऊन विजेच्या खांबाला धडकली. कारच्या एअरबॅगही उघड्या होत्या. त्यामुळे तरुणाला जबर मार लागला. घडलेल्या प्रकारानंतर कार चालकाने गाडी सोडून धूम ठोकली.



दरम्यान, अपघातात जखमी झाल्याने तरूणाला त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (Accident Caught on CCTV) तपासून कार ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला आहे.