मुंबई : २०१७ सालचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यात नववर्षांचं स्वागत करण्यासाठी अनेकजण सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरामदायी प्रवासासाठी अनेकजण विमानसेवेची निवड करतात. याकरिता एअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये आता स्पर्धा तीव्र असताना स्पाईसजेट्ने चक्क मोफत विमानप्रवासाकही सोय खुली केली आहे. 


कसे कराल बुकिंग ?


स्पाईस जेटच्या मोफत विमानप्रवासाकरिता तुम्हांला स्पाईस जेटच्या वेबसाईटवर ()लॉग ईन करायचे आहे. तेथूनच तुम्हांला तिकीट बुक करावे लागणार आहे. 


मोफत विमान प्रवास अशी ऑफर असली तरीही तुम्हांला पैसे भरून तिकीट बुक करायचे आहे. तुमचे पैसे नंतर अकाऊंटमध्ये रिडीम केले जातील. 


कधी पर्यंत कराल बुकिंग ? 


स्पाईस जेटच्या विमान तिकीटांसाठी   1 डिसेंबरपासून तिकीट बुकिंग सुरू करणार आली आहे. 


ही तिकीट बुकिंग 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 


तुम्ही 31 मार्च 2018 पर्यंतची तिकीटं बुक केल्यास या मोफत विमानप्रवासाचा फायदा घेऊ शकाल.  



काय आहे रिडीम पॉलिसी 


स्पाईस जेटच्या अकाऊंटमध्ये लॉग ईन केल्यानंतर त्याचे डिटेल्स भरायचे आहेत. तुम्हांला ईमेल आणि मोबाईल क्रमांकावर एक कोड मिळेल. 


स्टाईल कॅश हे स्पाईस जेटचे ई व्हॉलेट  


तुमचे रीडीम झालेले पैसे स्टाईल कॅश अकाऊंटमध्ये येतील.  हे पैसे बॅंक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही. 


स्टाईल कॅशची रक्कम तुम्ही स्पाईस स्टाईलमध्ये  शॉपिंगसाठी वापरू शकता.