मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने काही राज्यांनी दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे जर तुम्ही विमानप्रवास करत असाल, तर त्या-त्या राज्याच्या नियमावलीप्रमाणे साधारण ४८ ते ७२ तास (Corona test before air travel) आधी तुम्हाला कोरोनाचा निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे गरजेचे असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्ही जर फ्लाईट बूक केली असेल, आणि तुमचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर तुमचे पैसे वाया जातात. पण जर तुम्ही आता स्पाईसजेटचे (SpiceJet flights) बुकिंग केले, तर मात्र तुमचे पैसे वाया जाणार नाही. कारण स्पाईसजेटने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. 


काय आहे स्पाईस जेटची ऑफर? 
Budget Airline SpiceJet ने आपल्या प्रवाशांसाठी एका खास सुविधेची घोषणा केली आहे. जर तुम्ही स्पाईसजेटने प्रवास करणार असाल, आणि प्रवासाआधीचा तुमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तुम्हाला त्या तिकीटाचा संपूर्ण रिफंड मिळेल. अर्थात त्यासाठी अटही आहे. SpiceHealth.com वर तुम्हाला कोरोनाच्या RT-PCR चाचणीसाठी नोंदणी करावी लागेल. 


घरी येऊनही घेणार सॅंपल्स
ही सुविधा सध्या तरी दिल्ली, गुरूग्राम आणि मुंबईत दिली जात आहे. या सुविधेत तुमच्या घरी येऊनही सॅंपल्स घेतले जातील. 


२९९ रूपयांत कोरोना चाचणी
SpiceHealth ची आरटी पीसीआर टेस्ट ही केवळ २९९ रूपयांमध्ये करून देण्यात येईल. या चाचणीसाठी हॉस्पिटल किंवा लॅबमध्ये सध्या ८०० ते १००० च्या घरात दर मोजले जातात. केवळ स्पाईसजेटच नाही तर इतर विमान कंपन्यांचे प्रवासीही इथून कोरोना चाचणी करू शकतात. फक्त अशा प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ४९९ रूपये भरावे लागतील.