नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८, ३६,९२६ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये ६,८६,३९५ एक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशातील २०,९६, ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ५३,८६६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसत होता. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, गेल्या २४ तासांत जवळपास ७० हजार नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याचे दिसत आहे.



आनंदाची बातमी: कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला; पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट



महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १३,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. तर राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.