श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, पोलिसांसह 21 लोक जखमी
आताची सर्वात मोठी बातमी| श्रीनगरमध्ये सुरक्षा पथकावर ग्रेनेड हल्ला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सुरक्षा पथकावर ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये एका नागरीकाला आपला जीव गमवण्याची वेळ आली. तर पोलिसांसह 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध लाल चौकाजवळील हरी सिंह हाय स्ट्रीट भागात संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी हा हल्ला झाला.
अमीरा कदल परिसरात हा ग्रेनेड हल्ला झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर सुरक्षादलाने परिसरात नाकेबंदी केली आहे. तर जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पूर्ण ताकदीनं सुरक्षा दलाचे जवान काम करत आहेत.
SMHS रुग्णालयात आतापर्यंत 21 लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.