नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी 'नमामि गंगे' प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरमध्ये गेले होते. यावेळी गंगा नदीच्या अटल घाटावरील पायऱ्यांवर अडखळून ते पडले होते. यानंतर आता स्थानिक प्रशासनाने अटल घाटावरील या पायऱ्याच तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पायऱ्यांची उंची एकसमान नसल्याची जाणीव आता प्रशासनाला झाली आहे. यापूर्वीही अनेक लोक या पायऱ्यांवरून पडले होते. त्यामुळे याठिकाणी पुन्हा नवीन पायऱ्या तयार केल्या जातील, असे स्थानिक अधिकारी एम. बोबडे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवले तर बलात्कार होणार नाहीत'


'नमामी गंगे' प्रकल्पातंर्गत इंजिनियर्स इंडिया लिमिटेकडून कानपूरमधील दाहसंस्कार होणाऱ्या सर्व घाटांची बांधणी करण्यात आली होती. यामध्ये अटल घाटाचाही समावेश होता. मात्र, पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या प्रसंगानंतर प्रशासनाने संबंधित कंपनीला या पायऱ्या पुन्हा बांधण्याचे आदेश दिले आहेत.


आयटीबीपीच्या जवानांसाठी आता मॅट्रिमोनियल पोर्टल



पंतप्रधान मोदी पायऱ्यांवर अडखळून पडल्याच्या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी मोदींचा तोल जाऊन ते खाली पडण्याच्या बेतातच होते. परंतु, मोदींनी स्वत:ला कसेबसे सावरले. तोपर्यंत मोदींचे अंगरक्षकही त्यांच्या मदतीला धावून आले. सुदैवाने यावेळी मोदींना कुठलीही दुखापत झाली नव्हती.