शौक बडी चीज है; मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना लक्षवेधी सवयी
वाचून हैराणच व्हाल
मुंबई : देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचं नाव येतं. जागतिक पातळीवरही त्यांच्या व्यवसाय आणि श्रीमंतीची दखल घेतली जाते. अशा या गर्भश्रीमंत कुटुंबाविषयी कायमच सर्वसामान्यांना कुतूहल वाटतं. मुंबईतील त्यांच्या घराजवळून जात असताना नजरेस पडेल तिथपर्यंत त्यांचा प्रासाद नकळतच अनेकजण न्याहाळताना दिसतात. (starnge habits of reliance tycoon mukesh ambani and his family wife son read details)
अंबानी कुटुंबाची हीच श्रीमंती त्यांना विविध कारणांनी चर्चेत आणण्यासही कारणीभूत ठरते. आताचं कारण आहे, या कुटुंबातील मंडळींना असणाऱ्या वेगवेगळ्या आणि तितक्याच तऱ्हेवाईक सवयी.
नीता अंबानी एकच चप्पल, बूट दुसऱ्यांदा वापरत नाहीत
देशातील सर्वात लक्षवेधी महिलांपैकी एक असणाऱ्या नीता अंबानी या त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखल्या जातात. त्यांच्या चिरतरुण सौंदर्याचीही तितकीच चर्चा होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्या कपडे पुनहापुन्हा वापरत असल्या तरीही चपला मात्र कधीच दुसऱ्यांदा वापरत नाहीत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या चपला, बूट, स्लिपॉन्स आहेत.
मुकेश आणि नीता अंबानी यांच्या डेट नाईट...
मुकेश आणि नीता अंबानी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून न चुकता एकमेकांसाठीही वेळ काढतात. डेट नाईटवर जाणयासोबतच ते काही वेळेस आवडीचं स्ट्रीट फूड खाण्यासाठीही बाहेर पडतात. फॅन्सी आणि एक्झॉटिक खाण्यापेक्षा मुकेश अंबानी यांना स्ट्रीट फूड आणि घरचं जेवण जास्त आवडतं.
ईशा, आकाश आणि अनंतचे सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट
अंबानी कुटुंबाची तरुण पिढी इन्स्टाग्रामवर नाही असं सांगितलं जातं. मुकेश अंबानी यांच्या तुलनेत अनिल अंबानी यांचं कुटुंब सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. पण, तुम्हाला माहितीये का ईशा, आकाश आणि अनंतसुद्धा इन्स्टाग्राम वापरतात. सिक्रेट इन्स्टा अकाऊंटचा ते वापर करतात.
ईशा, म्हणजे पार्टी क्वीन
मुकेश अंबानी यांची लेक ईशा आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ओळखली जाते. ईशाच्या 2018 मधील विवाहसोहळ्याला पार्टी ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता, यावरूनच तुम्ही तिच्या या सवयीचा अंदाज लावू शकता.
सून श्लोकाला चहाचं वेड
मुकेश आणि नीता अंबानी यांची सून, श्लोका अंबानी हिला चहाचं प्रचंड वेड. तिच्या येण्यानं अंबानी कुटुंबात चहाच्या विविध प्रकारांचं कलेक्शन पाहायला मिळू लागलं.
असं म्हणतात की अंबानी कुटुंबातील दोन्ही मुलं, अनंत आणि आकाश यांनाही अशाच काही सवयी आहेत. या सर्व सवयी आणि कुटुंबाची शान पाहून तुम्ही काय म्हणाल?