मुंबई : जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नुकताच गेल आणि एचपीसीएल यांची जॉईंट वेंचर कंपनी अवंतिका गॅस लिमिटेडने आपल्या सीएनजी पंप नेटवर्क वाढवण्याची घोषणा केलीये. याआधी सरकारने देशभरात १००नवे सीएनजी पंप खोलण्याची घोषणा केली होती. खरंतर पेट्रोलच्या किंमती आणि प्रदूषणाचा वाढता स्तर पाहता सीएनजी कारची डिमांड वाढलीये. अवंतिका तीन शहरांत नवे सीएनजी पंप खोलण्याची योजना आहे. यासाठी कंपनीकडून निवेदन देण्यात आलेय. 


५ लाख रुपयांचा रिफंडेबल प्रोसेसिंग फी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला सीएनजी पंपची डीलरशिप मिळत असेल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी रोजगाराची चांगली संधी आहे. यासाठी तुम्हाला लेटर ऑफ इंटेट जारी करताना ५ लाख रुपयांचा रिफंडेबल प्रोसेसिंग फी म्हणून कंपनीकडे जमा करावी लागेल. 


पंप सुरु कऱण्यासाठी प्लॉट गरजेचा


सीएनची स्टेशन सुरु करायचे असेल तर त्यासाठी सर्वाधिक गरजेचा प्लॉट आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा प्लॉटबाबत कोणताही वाद नको. दुसरी अट म्हणजे हा प्लॉट मेन रोडशी कनेक्ट असला पाहिजे आणि अवंतिका गॅस लिमिटेडच्या नॅच्युरअल पाईपलाईनहून २ किमी पेक्षा जास्त दूर नको. 


वय आणि पात्रता


सीएनची पंप सुरु करण्यासाठी विशेष पात्रता हवी असे काही गरजेचे नाही. अर्ज करणाऱ्याने १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. यासोबतच त्या व्यक्तीचे वय २१ ते ६० वर्षे असले पाहिजे. तसेच अर्ज करणारा व्यक्ती अवंतिकाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य असू नये.


या शहरात खोलता येणार सीएनजी पंप


अवंतिका गॅस लिमिटेड सध्या इंदूर, उज्जैन आणि ग्वालियरमध्ये सीएनजी स्टेशनचा विस्तर करायचा आहे. कंपनीने या शहरात १२ पंप बसवण्यासाठी अर्ज मागवलेत. यात इंदूरमध्ये ५, उज्जैनमध्ये ४ आणि ग्वालियरमध्ये ३ सीएनजी पंप सुरु केले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जून २०१८ आहे. यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता.



तुमची स्वत:ची जमीन नसेल तर...


या बिझनेससाठी तुमची स्वत:ची जमीन नसेल तर तुम्ही जमीन भाड्यावरही घेऊ शकता. यासाठी जमिनीच्या मालकाकडून एनओसी घेणे गरजेचे आहे. 


अर्जाची प्रक्रिया


जर तुम्हाला सीएनजी स्टेशन सुरु करण्याबाबत इच्छुक आहात तर सगळ्यात आधी कंपनीच्या वेबसाईटवर www.aglonline.net क्लिक करावे लागेल. यानंतर डाव्या बाजूला सीएनजी डीलरशिपची लिंक दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर संबंधित पंप लोकेशनच्या बाबतीत जाणून घेऊ शकता. फॉर्मसोबत तुम्हाला ३ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा लागेल.