नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळलीय. यात लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्यायत, पगार कपात झालीय. पण यामध्ये घाबरुन जाण्याचे कारण नाही. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही व्यवसाय करुन चांगली कमाई करु शकता. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यात ५ हजार गुंतवून तुम्ही दरमहा मोठी कमाई करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या देशात छोट्यामोठ्या प्रमाणात मशरुमची शेती केली जाते. तुम्ही देखील मशरुम शेती करुन चांगली कमाई करु शकता. सुरुवातीला यासाठी जास्त जागेची गरज नसेल. 



तुम्ही हा व्यवसाय एका खोलीत सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला ५ ते ६ हजार रुपये खर्च करावे लागतील. मशरुम फार्मिंगसाठी मशरुम उगवणारी माती आणि बिजाचे मिश्रण ठेवावे लागेल.



 मशरुम उगवल्यानंतर घरातच पॅकींग किंवा कंपनीसोबत ऑनलाईन भागीदारी करुन विकू शकता. तुम्ही स्वत:चे एप बनवून मोठ्या प्रमाणात विक्री करु शकता. पण यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागेल. 



एक किलोग्राम मशरुम पॅकेट साधारण १०० ते १५० रुपयांपर्यंत मिळते. अशाप्रकारे तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता. अनेक संस्था या शेतीचे प्रशिक्षण देतात. तुम्ही प्रशिक्षण घेऊन देखील हा व्यवसाय सुरु करु शकता.