स्टार्टअप वुमनच्या निधनाने उद्योग जगताला धक्का; 720 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर
सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म `पंखुडी` आणि होम रेंटल स्टार्टअप `ग्रॅबहाऊस` सारख्या स्टार्टअपच्या संस्थापक पंखुडी श्रीवास्तव यांच्या आकस्मिक निधनाने उद्योग जगताला धक्का बसला आहे
नवी दिल्ली : सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म 'पंखुडी' आणि होम रेंटल स्टार्टअप 'ग्रॅबहाऊस' सारख्या स्टार्टअपच्या संस्थापक पंखुडी श्रीवास्तव यांच्या आकस्मिक निधन झाले आहे. पंखुडी 32 वर्षीय मुळच्या झासी येथील रहिवासी होत्या.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पंखुडी श्रीवास्तव यांच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. 'पंखुडी' च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
त्यात म्हटले की, आमच्या कंपनीच्या सीईओ पंखुडी श्रीवास्तव यांचे 24 डिसेंबर रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अलीकडेच, 2 डिसेंबर 2021 रोजी पंखुरीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता.
पंखुडी यांच्या आकस्मिक निधनाने अनेक स्टार्टअप जगाला मोठा धक्का बसला आहे. त्यात पंखुडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांचाही समावेश आहे.
पहिली कंपनी 2012 मध्ये स्थापन
पंखुडी श्रीवास्तव यांनी 2012 मध्ये त्यांची पहिली कंपनी ग्रॅबहाऊस स्थापन केली. याला सेक्वॉइया कॅपिटल, कलारी कॅपिटल आणि इंडिया कोटिएंट यांनी त्यात गुंतवणूक केली होती.
त्यातून लोकांना भाड्याने घरे मिळण्यास मदत होत असे. नंतर ती कंपनी क्विकरने विकत घेतली. यानंतर त्यांनी 'पंखुडी' सुरू केली. हे महिलांसाठी एक सोशल कम्युनिटी नेटवर्क होते.