नवी दिल्ली : देशातील सरकारी बँक, भारतीय स्टेट बॅंकने (State Bank of India) झीरो बँलेन्स खात्यांबाबत नियमांमध्ये काही बदल केले आहेत. एसबीआयने (SBI) आता झीरो बँलेन्स खात्यांवर दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) मार्गदर्शक सुचनांनूसार, एसबीआयने हे बदल केले आहेत. नवीन सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे (Know Your Customer) नियम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिरो बॅलेन्स खात्यांना, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट (BSBD Account) म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात गरीब वर्गातील लोकांना बँकिंग सिस्टमशी जोडण्यासाठी झीरो बॅलेन्स खात्यांची सुरुवात केली होती. झीरो बॅलेन्स खाते कोणत्याही सरकारी बँकमध्ये सुरु करता येते. सरकारी बँकांनंतर खासगी बँकांनीही झीरो बॅलेन्स खाती उघडण्यास सुरुवात केली.


झीरो बॅलेन्स खात्यांवर आतापर्यंत डेबिट कार्डची (Debit Card) सुविधा देण्यात येत होती. परंतु आता एसबीआयने या सुविधांमध्ये वाढ केली आहे. झीरो बॅलेन्स खातेदारांना डेबिट कार्डसह आता इंटरनेट बँकिंगची (Internet Banking) सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच डेबिट कार्डमधून महिन्यांतून ४ वेळा कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.


या सोयींसाठी झीरो बॅलेन्स खातेदाराला त्याच्या खात्यात कमीत कमी किंवा जास्तीत जास्त बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. यात इतर सेव्हिंग खात्यांप्रमाणे व्याजही मिळते.