मुंबई : वाढत्या महागाईमुळे प्रत्येकाला आपला पगार कमी पडतो. त्यामुळे प्रत्येक जण हा कमाईचा नवा स्त्रोत शोधत असतो. तुम्हीही जर अशाच शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला एक अशी बिजनेस आयडिया सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची दरमहा निश्चित एका आकड्यापर्यंत कमाई होईल. या बिजनेसच्या माध्यामातून तुम्ही काहीही न करता जवळपास 60 हजार रुपये मिळवू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा होण्याचा चान्सच नाही. (state bank of india earning opportunities start sbi atm franchise know how to apply)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अर्थात एसबीआय बिजनेस करण्याची संधी देत आहे. यासाठी फक्त तुमच्याकडे 50 ते 80 फुट इतकी जागा असायला हवी. एसबीआयची एटीएम फ्रँचायजी (SBI ATM Franchise)  घेऊन तुम्ही कमाई करु शकता.    


फ्रँचायजी कशी मिळवायची? 


एसबीआय एटीएम फ्रँचायजी (SBI ATM Franchise ) मिळवण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त नजीकच्या एसबीआय बँकेच्या शाखेत जावं लागेल. तिथे आसपासच्या परिसरात एटीएमची गरज आहे की नाही, इतकं माहित करुन घ्यावं लागेल. 


बँकेला आसपासच्या भागात एटीएम सुरु करायचं असेल तर तुमचं काम झालंच समजा. पण यानंतर मुद्दा येतो तो जागेचा. एटीएम फ्रँचायजीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे 50 ते 80 फुट इतकी जागा असायला हवी. तुमच्याकडे मोक्याच्या तसेच लगबग असलेल्या ठिकाणी इतकी जागा असली, तर तुमचं काम झालंच म्हणून सांगा.


ही फ्रँचायजी सिक्योरिटी डिपॉझीट म्हणून 2 लाख रुपयांची रक्कम भरुन घेता येईल. तसेच 3लाख रुपये हे वर्किंग कॅप्टिल म्हणून द्यावे लागतील. एकूण 5 लाख रुपयांची गुतंवणूक करावी लागेल. ही जमा करण्यात येणारी रक्कम करार रद्द झाल्यानंतर परत केली जाते. 


फ्रँचायजीसाठी असा अर्ज करायचा?


एसबीआय एटीएम फ्रँचायजी देण्याची जबाबदारी ही विशिष्ठ कंपन्यांना देण्यात आली आहे. त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करावा. एटीएम कंपनी आणि एटीएम मशीन बसवणारी कंपनी या दोन्ही वेगळ्या असतात. भारतात सर्वसाधारणपणे एटीएम बसवण्याची जबाबदारी ही ठराविक कंपन्यांची आहे. 


यामध्ये टाटा इंडीकॅश (Tata Indicash), मुथुट एटीम (Muthoot ATM) आणि इंडिया वन एटीएम India One ATM या कंपन्यांचा समावेश आहे. वरील या कंपन्यांच्या वेबसाईटच्या माध्यामातून फ्रँचायजीसाठी अर्ज करु शकता.


कागदपत्र काय लागणार?


ओळखपत्र (Aadhaar Card , Pan Card , Voter Card)
अ‍ॅड्रेस प्रूफ (रॅशन कार्ड, वीज बिल)
बँक अकाउंट आणि पासबूक
फोटो, ई-मेल आईडी, मोबाईल नंबर
GST नंबर
फाइनेंशियल डॉक्युमेंट्स


फ्रँचायजीधारकाला दरमहा किती मिळणार? 


प्रत्येक एटीएम कॅश ट्रांजेक्शनवर (Cash Transactions) 8 रुपये मिळतात. तर एका नॉन कॅश ट्रांजेक्शनवर (Non Cash Transactions) 2 रुपये मिळतात. मिनी स्टेटमेंट, बॅलेन्स इनक्वायरी हे आणि इतर जे काही पर्याय असतात, ते सर्व प्रकार नॉन कॅश ट्रांजेक्शनमध्ये मोडतात. 


समजा दररोज फ्रँचायजी घेतलेल्या एटीएमधून 250 ट्रांजेक्शन होतात. या 250 ट्रांजेक्शनपैकी 65 टक्के कॅश ट्रांजेक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांजेक्शनचा समावेश असेल, तर दर महिन्याला 45 हजार रुपये  मिळतील. तसेच दररोज 500 पेक्षा अधिक वेळा एटीएममधून व्यवहार झाला, तर कमीशन म्हणून 88 हजार ते 90 हजार रुपये मिळतील.