नवी दिल्ली : आता दिवाळीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्या म्हणजे १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्याच आठवड्यात रेपो दरात कपात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सण आणि उत्सव काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी एसबीआयने एमसीएलआरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहेत. 


देशाची अर्थव्यवस्था मंदीत आहे. या मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर या दिवशी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करत तो ५.१५ टक्के केला होता. गेल्या ९ वर्षांत पहल्यांदाच इतका कमी रेपो दर कपातीचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. तसेच गेल्याच आठवड्यात बॅंकेने रेपो दरात कपात केली.