State Bank of India (SBI) मध्ये असणाऱ्या खातेधारकांची संख्या कमी नाही. दिवसागणिक या बँकेत खातेधारकांची संख्या वाढत असतानाच आता बँकेकडून एक नवं पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यातही तुम्हीसुद्धा खातेधारकांपैकी एक असून, जर WhatsApp वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयकडून व्हॉट्सअॅप बँकिंग सर्विसची (WhatsApp Banking service) सुरुवात करण्यात आली आहे. अधिकृतपणे ट्वीट करत बँकेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. या नव्या निर्णयामुळं खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी आता कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याची किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. 


तुमची बँकच आता WhatsApp वर आलीये, असं सांगत आता चालता-बोलता अगदी सहजपणे बँकेचं स्टेटमेंट तुम्हाला मिळू शकणार आहे, असं ट्वीट करत सांगण्यात आलं. WhatsApp बँकिंगसाठी खातेधारकांनी फक्त +919022690226 या क्रमांकावर 'Hi' पाठवणं गरजेचं असेल. 


SBI Bank अकाऊंट स्टेटमेंटसाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा 
- सर्वप्रथम एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग सेवेसाठी अकाऊंट रजिस्टर करा. 
- यासाठी तुम्ही बँकेत दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून 917208933148 वर "SMS WAREG A/c No" एक मेसेज पाठवा. 
- रजिस्ट्रेशन पूर्ण होताच +919022690226 या क्रमांकावर 'Hi' पाठवा. 
- यानंतर, "प्रिय ग्राहक, एसबीआई .....स्वागत है" असा एक मेसेद येईल. 


खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा 
- खात्यातील शिल्लक रक्कम/ Balance 
- मिनी स्टेटमेंट 
- व्हॉट्सअॅप बँकिंगमधून डी- रजिस्टर 


गरजेनुसार पर्याय निवडून तुम्ही अपेक्षित गोष्टींची माहिती अगदी सहजपणे मिळवू शकता.