आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, कारण...
बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची
मुंबई : शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला सुरुच आहे. सेन्सेक्स 1200 अंकांनी गडगडला असून निफ्टी 400 अंकांनी खाली आला आहे. भारतीय शेअर बाजारावर आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली आहे. ओमायक्रॉमच्या वाढत्या संख्येचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक संकेतांमुळे गेल्या काही आठवड्यापासून बाजारात प्रचंड दबाव होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह देखील हवा तसा नव्हता. ज्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसून आला.
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनबद्दल चिंता वाढताना दिसत आहे. जगातील सर्व देशांमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमामात वाढत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थिती, यूएस फेडने व्याजदरात आणखी वाढ करण्याच्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. जगातील सर्व केंद्रीय बँका व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहेत.