Best Stock Market Courses after 12th: स्टॉक मार्केट शिकायचं आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Stock Market Courses after 12th: दहावी-बारावीच्या सुट्ट्या संपल्या की आपल्याला आपल्या पुढील शिक्षणासाठी (Best Courses After 12th) धडपड करावी लागते. अशावेळी कोणते कोर्स करिअरच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत याचा विचारही पालकांना आणि मुलांना (Best Stock Market Courses to Offer) करावा लागतो परंतु अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही इंटरेस्टिंग अशा स्टॉक मार्केट (Stock Market Analysis) कोर्सेसचा विचार करू शकता.
Stock Market Courses after 12th Exam: मार्च - एप्रिलचा हा सिझन विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाचा असतो कारण यावेळी काहींच्या परीक्षा (12th Exams) या सुरू असतात तर काहींच्या संपत आलेल्या असतात. त्यामुळे सुट्ट्या पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी असते ते म्हणजे शिक्षणानंतर (Career After 12th) पुढे करिअरमध्ये नवं काय करता येईल, शिकता येईल हे पाहण्याची. परंतु सध्याचा काळ हा 10-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो. दहावी-बारावीनंतर कोणते कोर्स करायचे याबद्दलची माहिती काढायलाही विद्यार्थी या काळात सुरूवात करतात.
सध्या बारावीनंतर करण्यासारखे असे अनेक कोर्सेस आहेत जे विद्यार्थी हे ऑनलाईन आणि ऑफलाईन (Online Stock Market Courses) मार्फेत शिकू शकतात. या कोर्सची फीही पालकांच्या खिशाला परवडणारी आहे. यामधील सर्वात महत्त्वाचे कोर्स म्हणजे स्टॉक मार्केट्सचे कोर्स! (stock market courses after 12th exam know the best courses that student and parents can afford eduction news marathi)
स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटबद्दल तुम्ही जाणून घ्याल तेवढं कमी आहे. सध्या जमाना आहे तो डेटा सायन्स आणि स्टॉक मार्केटचा. त्याचबरोबर बेस्ट सेलर आणि बायर यांची माहितीही शोधण्याची शैली सध्या या कोर्समधून विकसित होते आहे. कॅन्डलस्टिक्स आणि व्हॉल्यूमकडे (Candlesticks and Volume) लक्ष ठेवणे, खाली वर होणाऱ्या शेअर्सच्या आलेखाकडे लक्ष देणे आणि त्याचबरोबर सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex and Nifty) यांचा अभ्यास आणि शेअर मार्केट फोरकास्टिंग अशा नानाविध अभ्यासक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना हमखास होईल.
स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही विविध पर्याय धुंडाळू शकता. तुम्ही बारावी आणि ग्रॅज्यूएशननंतर हे कोर्स करू शकतात. यामध्ये थिअरी, प्रॅक्टिकल आणि मुख्य म्हणजे फन्डामेंटल्स शिकवले जातात. या कॉर्सेसची फी ही साधारणपणे 50,000 रूपयांपासून ते 1 लाख रूपयांपर्यंत असते. एनएससीई आणि बीएससीईचे हे कोर्स (BSE and NSE Courses) तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.
बीएससीईचे कोर्स -
NSE अकादमीचे सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल (NCMP) कोर्स, NSE अॅकॅडमीचे सर्टिफिकेट इन फायनान्शियल मार्केट्स - NCFM, NCFM फाउंडेशन, इंटरमीडिएट, अॅडव्हान्स्ड कोर्स, NSE FinBasic
सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल, NCMP प्रवीणता प्रमाणपत्र असे काही कॉर्सेस तुम्ही करू शकता. याशिवाय अनेक डिग्रीनंतरचे डेटा सायन्स आणि स्टॉक मार्केटचेही कोर्सेस आहेत. त्याचसोबत फोरकास्टिंगचेही कोर्सेस तुमच्या फायद्याचे आहेत. यातून शेअर मार्केटबद्दल तुम्ही अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता.