COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आहे. उद्या म्हणजेच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. उद्या देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल. भारतीय या वर्षी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. यानिमित्ताने शेअर बाजारही बंद असणार आहे. गुरुवारी म्हणजेच 27 जानेवारी 2022 रोजी, बाजारात व्यवहार नियमित सुरू राहतील.


येणाऱ्या सुट्ट्या
बीएसई हॉलिडे कॅलेंडरवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या वर्षी शेअर बाजारात अनेक सुट्ट्या आहेत. एक्सचेंज आधीच या सुट्ट्यांची यादी जारी करते. परंतु, काही वेळा या सुट्ट्यांमध्ये बदल केले जातात, ज्यासाठी स्वतंत्र आदेश जारी केला जातो. 


26 जानेवारी 2022 नंतर 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्री आणि 18 मार्च 2022 रोजी होळीनिमित्त शेअर बाजार बंद असणार आहे.


जानेवारीत किती दिवस बाजार बंद 


भारतीय शेअर बाजार 1 जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षातही खुला असतो. या दिवशी जगभरातील शेअर बाजार बंद असतात. अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये 31 डिसेंबरलाही बाजारपेठांना सुट्टी असते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि हाँगकाँगचे शेअर बाजारही 1 जानेवारीला बंद असतात. भारतात नववर्षानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी नसते.


एप्रिल 2021 नंतर बाजारात मोठी घसरण!


सोमवारी( 24 जानेवारी 2022) रोजी भारतीय बाजारात एप्रिल 2021 नंतरची सर्वात मोठी घसरण झाली. बेंचमार्क निर्देशांक 2.6 टक्क्यांनी घसरून 17,149.10 वर बंद झाला आणि सेन्सेक्स 15,000 अंकांनी घसरून 57,491.51 वर बंद झाला.