Mahavir Jayanti 2023: तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवलेत तर ही बातमी तुमच्या कामाची...
Share Market Hoilday: देशभरात आज महावीर जयंती उत्सव साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. बीएसई (Bombay Stock Exchange) आणि एनएसई (NSE - National Stock Exchange) वरील व्यवहार आज म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण सत्रासाठी बंद असणार आहे.
Stock market holiday : आज महावीर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे. या आठवड्यात शेअर बाजाराला दोन दिवस सुट्टी असणार आहे. आज महावीर जयंतीनिमित्त तर शुक्रवारी गुड फ्रायडेच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी असेल. एकंदरीत या आठवड्यातील व्यवहार बुधवार आणि गुरूवारी सुरू होणार असल्याची माहिती बीएसईवर उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घ सुट्टीचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमचासाठी शुभ ठरू शकतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई बाजारातील सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
6 पैकी 4 दिवस बाजार बंद
एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार या आठवड्यात बाजारात 4 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे जर एखाद्याला लांबच्या सहलीला जायचे असेल तर हा आठवडा खूप उपयुक्त ठरू शकतो. कारण आज दिवसभर बाजारपेठ बंद राहणार आहे. डिपॉझिटरी डेटानुसार फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत.
वाचा: पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, येथे चेक करा नवे दर
2023 मध्ये आतापर्यंतची बाजारातील कामगिरी
2023 मध्ये आतापर्यंत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. कारण या काळात निफ्टी 4.4% आणि सेन्सेक्स 3.34% घसरला आहे. बँक निफ्टी 5.6 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. या कालावधीत ITC चा वाटा मजबूत परताव्यात आघाडीवर आहे. समभागाने 2023 मध्ये आतापर्यंत 14 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर बजाज फिनसर्व्हचा स्टॉक 18 टक्क्यांनी घसरला आहे.
2023 मध्ये या दिवशी शेअर बाजार बंद राहील?
- 4 एप्रिल 2023 : महावीर जयंती
- 7 एप्रिल 2023 : गुड फ्रायडे
- 14 एप्रिल 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- 1 मे 2023 : महाराष्ट्र दिन
- 28 जून 2023 : बकरी ईद
- 15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिन
- 19 सप्टेंबर 2023: गणेश चतुर्थी
- 2 ऑक्टोबर 2023: गांधी जयंती
- 24 ऑक्टोबर 2023: दसरा
- 14 नोव्हेंबर 2023: दिवाळी
- 27 नोव्हेंबर 2023: गुरु नानक जयंती
- 25 डिसेंबर 2023: ख्रिसमस