मुंबई Big downfall in Indian Stock market : जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्येही आज तुफान घसरण नोंदवली गेली. अमेरिकचे बाजारात झालेल्या जोरदार विक्रीचे पडसाद आज सकाळी उघडलेल्या आशियाई बाजारात पडसाद उमटले आहेत. बाजार उघडताच बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 950 इतक्या अंकांनी घसरून 53250 स्तरावर व्यवहार करीत होते तर एनएससी निर्देशांक निफ्टीमध्ये 280 इतक्या अंकांची घसरण नोंदवण्यात आली असून 15960 च्या स्तरावर व्यवहार करीत आहे.


भारतीय बाजारही जागतिक पडझडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारही मोठ्या प्रमाणात गडगडला आहे. भारतीय शेअर बाजारात आज आठवड्याच्या वायदा व्यवहारांचा अखेरचा दिवस असल्यानं मोठी उलथापालथ दिसून आली आहे. चालू आठवड्यात मंगळवारी बाजारानं मोठी उसळी घेतली होती.  त्यामुळे बाजार पुन्हा एकदा सतरा हजाराच्या दिशेनं वाटचाल करेल अशी आशा निर्माण झाली होती. पण आज या तेजीला पुन्हा मोठा ब्रेक लागला आहे.