मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये एकाहून एक दमदार शेअर आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही शेअर असे आहेत की, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षाही अधिक आहे. परंतु या शेअरची वॅल्यू दमदार आहे. असे शेअर येणाऱ्या दिवसांमध्ये दमदार कमाई देऊ  शकतात. असाच एक शेअर म्हणजेच NCC ltd. होय. ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. कंपनीच्या शानदार निकालांनंतर ब्रोकरेज हाऊसेसनेही गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

32 टक्क्यांनी मिळू शकतो परतावा
ब्रोकरेज हाऊस जियोजीतने NCC.ltd मध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने शेअरसाठी 130 रुपयांचे लक्ष दिले आहे. शेअरचा भाव सध्ये 78 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. सध्याच्या किंमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना साधारण 32 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. NCC ची ऑर्डरबुक मजबूत आहे.


येणाऱ्या दिवसांमध्ये कंपनी आपली बॅलेन्सशीट मजबूत करण्यावर फोकस करणार आहे. कंपनीकडे 39 हजार 112 कोटी रुपयांची ऑर्डर आहेत. त्यामुळे 3-4 वर्षात कंपनीचा महसूल वाढण्याची शक्यता आहे. जल जीवन मिशनच्या अंतर्गत कंपनीला आणखी ऑर्डर भेटण्याची आशा आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टनेसुद्धा शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आणि 100 रुपयांचे टार्गेट दिले आहे.


झुनझूनवालांची भागीदारी
कन्स्ट्रक्शन कंपनी NCC ltd च्या शेअर्समध्ये राकेश झुनझूनवाला यांची 619 कोटींची गुंतवणूक आहे. त्यांनी कंपनीच्या शेअरवर विश्वास कायम ठेवत गुंतवणूकीत बदल केलेला नाही. जून तिमाहीमध्ये झुनझूनवाला यांच्याकडे कंपनीची 12.8 टक्के भागीदारी आहे.