मुंबई : दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांच्या पोर्टफोलिओला अनेक गुंतवणूकदार फॉलो करतात. त्यांच्या पोर्टफोलिओनुसार आपली स्ट्रॅटेजी बनवतात. सप्टेंबर 2021च्या तिमाहीमधील आकडेवारीनुसार आरके दमानी यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील अनेक स्टॉक्सवर विश्वास कायम ठेवला आहे. काही स्टॉक्समध्येतर आपली भागीदारी आणखी वाढवली आहे. जाणून घेऊ या दमानी यांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कायम ठेवली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेड (Mangalam Organics ltd)
मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेडच्या सप्टेंबर 2021च्या तिमाही शेअर होल्डिंग पॅटर्न नुसार राधाकृष्ण दमानी यांची कंपनीमध्ये एकूण होल्डिंग 2.2 टक्क्यांहून वाढून 4.3 टक्के झाली आहे. मागील वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना 75.26 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 
आतापर्यंत मंगलम ऑर्गेनिक्सच्या शेअर्समध्ये 83.60 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली आहे. आज शेअरचा भाव 765 रुपयांच्या आसपास होता.


VST इंडस्‍ट्रीज (VST Industries)
VST Industries चे सप्टेंबर 2021 मधील तिमाहीचे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार आरके दमानी यांची एकूण होल्डिंग 32.3 टक्के असणार आहे. या कंपनीमध्ये दमानी यांची कंपनी ब्राइट स्टार इन्वेस्टमेंट प्रायवेट लिमिटेडची भागीदारी 25.95 टक्के होती. या शेअर्समध्ये देखील राधाकृष्ण दमानी यांनी गुंतवणूक वाढवली आहे. 


आंध्रा पेपर लिमिटेड (Andhra paper ltd)
आंध्रा पेपर लिमिटेडमध्ये सप्टेंबर 2021च्या तिमाहीमध्ये आरके दमानी यांनी गुंतवणूक कायम ठेवली आहे. मागील एका वर्षात या शेअरने 28.87 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 21 ऑक्टोबर 2021 ला कंपनीचा शेअर 235 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता.


ट्रेंट लिमिटेड (Trent Ltd) 
आर के दमानी यांनी ट्रेंट लिमिटेडचा शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची गुंतवणूक कायम ठेवली आहे. एका वर्षात या शेअरने 73.28 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 21 ऑक्टोबर 2021 ला शेअरचा भाव 1070 वर ट्रेड करीत होता.