मुंबई : शेअर बाजारात सतत वाढत होत असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. शेअर बाजारात नवा उच्चांक झाला आहे. निफ्टीने  आज 16 हजार रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 16 हजारावर जाऊन पोहचला आहे.  सर्वोच्च स्थानी पोहचल्यावर थोडी विक्री आली असली तरीही तेजी मात्र कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळपासूनच आयटी क्षेत्रातली कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदी बघायला मिळते आहे. त्याला बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांची
साथ मिळाली. त्यामुळेच आज सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकानं 100 अंकांची उसळी नोंदवून ऐतिहासिक 16 हजाराचा टप्पा ओलांडला. 


याआधी निफ्टीचा उच्चांक 15 हजार 962 होता. वारंवार 15 हजार 960 जवळ जाऊन निर्देशांक खाली घसरत होता. आज मात्र निफ्टीनं हा अडथळा दूर करून 16 हजाराची पातळी गाठली आहे. वरच्या स्तरावर थोडीफार नफा वसुली होत असली, तरी तेजीचा सूर मात्र बाजारात कायम राहिल असा तज्ज्ञांचा होरा आहे.