मुंबई : जागतिक स्थरावरील काहीशा नकारात्मक संकेतांदरम्यानही भारतीय शेअऱ बाजारात दमदार तेजी नोंदवण्यात आली. भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या निशानासह सुरू झाले. BSE चा निर्देशांक सेन्सेक्स 124 अंकांनी वाढून 58977 वर पोहचला तर, NSE चा निर्देशांक निफ्टी 45 अंकानी वाढून 17566 वर पोहचला. सेन्सेक्स 30 मधील 24 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निफ्टीत तेजी आणि घसरण झालेले शेअर


निफ्टीमध्ये NESTLE INDIA, SBI LIFE, ICICI BANK, CIPLA आणि SUN PHARMA च्या शेअर्समध्ये मोठी उसळी नोंदवली गेली. तर  ASIAN PAINT, HCL TECH, ADANI PORTS, INFSOYS आणि HDFC च्या शेअर्समध्ये घसरण झाली. 


जागतिक बाजारातील संकेत


जागतिक बाजारातून मिळालेल्या मंद संकेतांदरम्यान, अमेरिकेतील शेअर बाजार दबावात असलेले दिसून आले. डाऊ जोन्स दोन दिवसांपासून एका ठाराविक रेंजमध्ये ट्रेड करीत आहे. तर नॅस्डॅकमध्ये तब्बल 1.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. ग्लोबल मार्केटमधील मंदीचा परिणाम आशियातील बाजारांमध्येही दिसून आला.


सेन्सेक्स चार महिन्यांच्या उच्चांकावर


आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सेन्सेक्स 465 अंकांच्या वाढीसह चार महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 465.14 अंकांच्या वाढीसह 58,853.07 वर बंद झाला. 11 एप्रिलनंतर सेन्सेक्सची ही सर्वोच्च पातळी होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127.60 अंकांच्या वाढीसह 17,525.10 अंकांवर बंद झाला.