मुंबई : दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांआधी 100 रुपयांहून कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवण्याची संधी आहे. मागील एका वर्षात शेअर बाजाराची तेजीमध्ये अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अनेक कंपन्या अशा आहेत. ज्यांच्या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. तुम्ही अशाच शेअरच्या शोधात असाल तर,  फेडरल बँक (FEDERAL BANK)च्या शेअरचा विचार करू शकता. या शेअरचा दर 84 रुपयांच्या आसपास आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने या शेअरसाठी 110 रुपयांच्या लक्षांसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाय वॅल्युएशनच्या मार्केटमध्ये चांगला पर्याय
शेअर बाजाराचे वॅल्युएशन सध्या जास्त आहे. अशातच अनेक शेअर खुपच महाग झाले आहेत. फेडरल बँकेच्या शेअरचे वॅल्युएशन अजुनही वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आतापर्यंत शेअरमध्ये 24 टक्क्यांपर्यंतची तेजी नोंदवली गेली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 110 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. 


फेडरल बँकेचा परफॉमन्स
30 जून 2021 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये बँकेचा नेट प्रॉफिट 8.7 टक्क्यांनी घसरला होता. बॅड लोनसाठी प्रोविजनिंग वाढल्याने बँकेला नुकसान सोसावे लागले. परंतु या तिमाहीत बँकेचे उत्पन्न वाढले आहे. ते 4005कोटी रुपये झाले. जे गेल्या वर्षातील याच तिमाहीत 3932 कोटी रुपये होते. फेडरल बँक खासगी क्षेत्रातील बँक असून बँकेचे मुख्यालय कोची येथे आहे.