मुंबई : जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असाल तर अनेकदा ऐकले असेल की हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर बनला. मल्टीबॅगर शेअर ते असतात ज्यांची सध्याची किंमत कमी असते. परंतु कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असल्याने ते मल्टीपल टाइम्स रिटर्न देतात. जसे की तम्ही 50 रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आणि 2-3 वर्षांनी तो शेअर 200-300 रुपयांवर पोहचला तर असा शेअर मल्टीबॅगर शेअर ठरतो. जाणून घेऊया मल्टीबॅगर शेअरची निवड कशी करावी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या ग्रोथची क्षमता ओळखा
मल्टीबॅगर बनन्याची क्षमता ठेवणारी कंपनी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या कंपन्यांपेक्षा सक्षम दिसते. त्यासाठी शेअर निवडण्याआधी कंपनीच्या ग्रोथची क्षमता किती आहे. याची ओळख होणे गरजेचे आहे. कोणती कंपनी जास्त अपडेटेड व्यवसाय करतेय याबाबत अभ्यास असायला हवा.


फ्री कॅश फ्लो
जर कंपनी फ्री कॅश फ्लो जनरेट करीत आहे तर त्याचा अर्थ कंपनीच्या प्रगतीला चांगला वाव आहे. या माध्यमातून कंपनी सहजपणे आपली कर्जफेड करू शकते.


कंपनीवर किती कर्ज
गुंतवणूकीआधी बघा की, कंपनीवर जास्त कर्ज तर नाही. कंपनीवर जास्त कर्ज असेल तर त्याचा परिणाम व्यवहार आणि कामकाजावर पडतो.



गुंतवणूकीआधी कंपनी नफा घेतेय की नाही हे तपासायला हवे. कोणत्याही कंपनीचे मल्टीबॅगर बनन्यासाठी ती बदलत्या काळानुसार नफा कमावत आहे की नाही. हे तपासायला हवे.


शेअरचे वॅल्युएशन चेक करा
गुंतवणूक करण्याआधी शेअरचे वॅल्युएशन चेक करा, जर कंपनीचा शेअर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअरपेक्षा जास्त आहे की कमी. अनेकवेळा फंडामेंटल मजबूत असणाऱ्या कमी किमतीच्या शेअर्सला मल्टीबॅगर समजले जाते.